मुंबई मध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आता पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे मात्र Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पार्ले भागात वाहनांची रांग लागली आहे. तर  Andheri Subway पाण्याखाली  गेल्याने तेथे सध्या वाहतूक थांबवली आहे. अनेक ठिकाणी वाहनं अडकून पडल्याने वाहतूक मंदावल्याचं देखील दिसून येत आहे.  Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video) .

Western Express Highway वरील वाहतूक

अंधेरी सब वे पाण्याखाली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)