पीएम नरेंद्र मोदींनी 12 जानेवारी रोजी मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन केले. नवी मुंबई येथे असलेला हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. मात्र, अटल सेतूच्या उद्घाटनापासून सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अटल सेतूवर लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. नागरिक अटल सेतूवर थांबून, जीवाची पर्वा न करता सेल्फी घेताना दिसत आहेत. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे, 'नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला हा 'अटल सेतू’, सुरक्षेला प्राधान्य देऊन अयोग्य वर्तन करण्यापूर्वी मनी आणू किंतु परंतु! सेतूवर थांबून किंवा त्यावर चढून फोटो काढणे धोकादायक तसेच बेकायदेशीर आहे. कृपया असा धोका पत्करू नका.'

13 जानेवारीपासून अटल सेतू लोकांसाठी खुला करण्यात आला मात्र, यावेळी लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष करून अटल सेतूला पिकनिक स्पॉट बनवले आहे. पुलावर वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. समुद्रावर 22 किमी लांबीचा हा पूल सेल्फी पॉइंट बनला आहे. (हेही वाचा: Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)