साधारण 23 हून अधिक लोकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने मध्य रेल्वेच्या तत्कालीन मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंटला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. राजेश रमेश नायक असे आरोपीचे नाव आहे. नायक याने दोन भावांकडून रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोकडे नायक विरुद्ध तक्रार केली. त्यानंतर चौकशी सुरु झाली. झडतीदरम्यान, सीबीआयने नायककडून विविध कागदपत्रे जप्त केली, ज्यात 23 हून अधिक लोक कथितपणे नायकच्या अमिषाला बळी पडले असल्याचे समोर आले. (हेही वाचा: Mumbai: बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य; पुण्यातील 31 वर्षीय व्यक्तीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)