मुंबईतील नागपाड परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर अन्य 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सिद्धार्थ नगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू झाले होते. जिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
पाहा पोस्ट -
Minor girl killed, three others injured after being crushed by RCC water tank burst in Nagpada area of Mumbai: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)