मुंबईतील भायखळा येथील सरकारी जेजे रुग्णालयात 132 वर्षे जुना बोगदा सापडला आहे. हा बोगदा ब्रिटिश काळात बांधलेला असून त्याची लांबी 200 मीटर लांबीचाआहे. जेजे रुग्णालयातील मेडिकल वॉर्डच्या इमारतीखाली हा बोगदा सापडला. पाणी गळतीच्या तक्रारीनंतर आम्ही नर्सिंग कॉलेजच्या इमारतीची पाहणी केली. पीडब्ल्यूडी अभियंते आणि सुरक्षा रक्षकांनी इमारतीचे सर्वेक्षण केले आणि 132 वर्षे जुना बोगदा सापडला. बोगदा एका टोकापासून बंद आहे अशी माहिती, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण राठोड यांनी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)