महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी चौथे महिला धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत आता सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आतापासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले आहे. जन्म प्रमाणपत्र, शाळेची कागदपत्रे, संपत्तीची कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य असणार आहे. येत्या 1 मे 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सध्या सरकारी कागदपत्रांमध्ये मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लिहिले जाते, तर मुलांच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे ऐच्छिक होते. मात्र, सरकारचे नवीन धोरण जाहीर झाल्यानंतर आता मुलांना त्यांच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे बंधनकारक होणार आहे. (हेही वाचा: SIT For Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार)
Maharashtra cabinet has decided that the name of the mother will be mandatory on all govt documents like Birth certificates, School documents, property documents, Aadhar cards, and PAN cards. The decision is to be implemented from 1st May 2024.
— ANI (@ANI) March 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)