विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे यांनी आज (7 जुलै) एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारले आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रविण दरेकर, गिरीश महाजन उपस्थित होते. दरम्यान नीलम गोर्‍हे यांनी नाराजीचं वृत्त फेटाळलं आहे. हा पक्षप्रवेश  विधिमंडळातील सेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये झाला आहे.  मुख्यमंत्र्यांनीही हा पक्ष प्रवेश ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. नीलम गोर्‍हे यांनी न्यायालयाच्या निकालानुसार सध्या निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षच अधिकृत शिवसेना असल्याचा स्पष्ट निकाल दिला आहे. केंद्र सरकारने अनेक सकारात्मक पावलं उचलली आहेत. त्यामुळे काम करण्याच्या दृष्टिने आपण एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. उपसभापतीपदी राहून त्या पदाच्या चौकटीत राहूनच  काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. Rahul Kanal Joins Shinde-led Shiv Sena: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)