भारत कोरोना विषाणू लढा देत असतानाच आता नवे ओमायक्रॉनचे संकट चालून आले आहे. देशात कोरोना नियम लागू असून त्याचे सक्तीने पालन केले जात आहे. मात्र कधी कधी सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडतो, अशावेळी त्याबाबत योग्य कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. नुकतेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर अशीच कारवाई केली आहे. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्याने मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचे सोशल मिडियावर कौतुक होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)