Man Blew Notes In Jaipur: तुम्हाला नेटफ्लिक्सची मनी हेस्ट ही मालिका आठवत असेल. तुम्हाला आठवत नसले तरी काळजी करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची आठवण येईल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण गाडीच्या छतावर उभं राहून नोटा उडवत आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा आवाजही ऐकू येतो. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, या खऱ्या नोटा आहेत आणि वीस रुपयांच्या आहेत.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, नोट उडवणार्‍या व्यक्तीने नेटफ्लिक्सच्या मनी हेस्ट या वेब सीरिजच्या पात्रासारखा मुखवटा घातलेला आहे. व्हिडिओमध्ये लोक नोटा लुटताना दिसत आहेत. या व्यक्तीच्या या कारवाईमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा व्हायरल व्हिडिओ जयपूरच्या वेस्टसाइड मॉलचा आहे. जो मालवीय नगर जयपूरमध्ये आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी ट्विटला उत्तर देताना सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)