छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्रामीण आणि शहरी भागात आज इंटरनेट बंद राहणार आहे. सध्या मराठा आरक्षणाचे लोण राज्यभर पसरलं आहे. सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील जालना मध्ये आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत पण काही ठिकाणी ही आंदोलनं हिंसक झाली आहेत. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून आता बीड प्रमाणेच छत्रपती संभाजीनगर मध्येही इंटरनेट बंद  ठेवले जाणार आहे. Maratha Reservation Protest: भिंवडीत मराठा समाज आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांच्या फोटोला काळे फासले .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)