गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस चालू आहेत. भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 24 तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अशात राज्यात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये जूनपासून आतापर्यंत एकूण 49 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 76 हून अधिक जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागाने दिलेल्या अहवालात ही आकडेवारी नमूद केली आहे. (हेही वाचा: Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ; एकूण 13 जण दगावले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)