रायगड मधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार एकूण 13 जण दगावले आहेत. यामध्ये 12 स्थानिकांचा आणि एका बचावकार्यात मदत कराणार्या एनडीआरएफ कर्मचार्याचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे. 22जण गंभीररित्या जखमी आहेत. अपुरा प्रकाश, सततचा पाऊस यामुळे या बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. परंतू मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री आज सकाळपासूनच घटनास्थळी दाखल आहेत. एनडीआरएफच्या जवानांना सध्या हातानेच माती उपसून अडकलेल्यांची मदत करावी लागत आहे. Khalapur Irshalwadi Landslide Helpline Number: इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरु, 8108195554 क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन.
पहा ट्वीट
Maharashtra | 12 bodies have been retrieved from the debris in Irshalwadi, Raigad; also one rescuer died of cardiac arrest. Total 13 deaths till now: Police https://t.co/D8nIawScIG
— ANI (@ANI) July 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)