हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागांसाठी हवामान अपडेट जारी केले आहेत. त्यानुसार 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या कमी दाबाचे एक क्षेत्र निर्माण होत आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोंकण परिसरात याचा प्रभाव जाणवेल. आज या ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, नंदुरबार, धुळे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Weather briefing on the ensuing rainfall activity over parts of Maharashtra during next 2 days : pic.twitter.com/6Xkuh8sKoc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)