महाविकास आघाडी सरकार मधून 35 पेक्षा जास्त शिवसेना आमदार बाहेर पडून एकनाथ शिंदेंच्या गोटात आल्याने आता राज्य सरकार कोसळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांना विधिमंडळात शिवसेनेचं नाव, पक्ष चिन्ह वापरता येऊ शकत नाही. त्यांच्याकडून संख्याबळावर आपणच खरी शिवसेना असा करण्यात आलेला दावा चूकीचा आहे.  त्यांना पक्षांतर कायदा अंतर्गत आमदारकी वाचवायची असेल तर आपला गट स्थापन करावा लागेल किंवा त्यांना इतर पक्ष किंवा संघटनेमध्ये सामील व्हावं लागणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)