Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना- ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) यांच्या चर्चा सुरु आहे. आता दिल्लीत उपस्थित असलेले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी सांगितले की, महाविकास आघाडी पक्ष 22 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र निवडणुकीसाठी 2024 च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल. वृत्तानुसार, महाराष्ट्र निवडणूक 2024 साठी पक्षाच्या सीईसी बैठकीपूर्वी, पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांशी बैठक घेतल्यानंतर, काँग्रेस यादी जाहीर करेल आणि शक्यतो पत्रकार परिषदही घेईल.

ते म्हणाले, ‘आम्ही तिघेही उद्या पत्रकार परिषद घेण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे आज रात्री आम्ही मुंबईला जाणार आहोत. तिथे मित्रपक्षांच्या नेत्यांशी बोलून उद्या यादी जाहीर करू.’ महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आज उमेदवारांची स्क्रीनिंग केली जात आहे. सीईसीची बैठक होणार आहे. लवकरच सर्वकाही समजेल.’ दरम्यान, झारखंड विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकांसोबतच यावेळी महाराष्ट्रातही निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपापूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश)

Maharashtra Assembly Elections 2024:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)