Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (एसपी) यांच्यात बैठकांची फेरी सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray)च्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके (Dnyaneshwar Katke) यांनी उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ज्ञानेश्वर कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar NCP) मध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्ञानेश्वर कटके यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, पुणे बांधकाम विभागाचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. (हेही वाचा -Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; विधानसभा निवडणूकीत इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना)
Ahead of #MaharashtraAssemblyElection, Dnyaneshwar (Mauli Aaba) Katke quits Shiv Sena (UBT) and joins Deputy CM Ajit Pawar-led NCP.
(Pic: NCP) pic.twitter.com/dHNQdzQwr1
— ANI (@ANI) October 21, 2024
महाविकास आघाडीत वाढला तणाव -
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढत आहे. बैठकांमागून बैठका होत आहेत, मात्र कोणताही तोडगा निघत नाही. तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम देत जागा निश्चित करा अन्यथा सोमवारी यादी जाहीर करू, असा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीने 24 तासांत चार बैठका घेतल्या आहेत. (हेही वाचा - Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मतदार यादीत घोळ', निवडणुक आयोगासह भाजपवर संजय राऊतांचा गंभीर आरोप)
महाविकास आघाडीत बैठकांची सत्र सुरूचं -
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक सुरू झाली आहे. तथापी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली आहे.