Mahaparinirvan Din 2023 Special Trains: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जात असून, हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओल्कःजाला जातो. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधत दरवर्षी बाब्साहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईमध्ये येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यामध्ये आणखी दोन गाड्यांची भर घालण्यात आली आहे. म्हणजेच महापरिनिर्वाण दिणानिमित्त मध्य रेल्वे 16 अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. या गाड्या 5 व 7 डिसेंबर रोजी चालवल्या जातील. रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने दादर चैत्यभूमी, आणि मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांच्या ठिकाणी दर्शन व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील मध्यवर्ती व्यवस्था याठिकाणी जय्यत सुरू आहे. या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच आढावा घेण्यात आला. (हेही वाचा: महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' अनमोल विचार शेअर करून करा महामानवाला त्रिवार अभिवादन!)
महापरिनिर्वाण दिन विशेष गाड्या-
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे आणखी २ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. या आधी १४ फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
🟠०१२१८ अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष-
दि. ०५/१२/२३ रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस… pic.twitter.com/hGrQ95bScO
— Central Railway (@Central_Railway) December 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)