कुर्ला मध्ये काल ( 9 डिसेंबर) च्या रात्री 9.30 च्या सुमारास बेस्ट बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये नेमकं काय झालं? याचा तपास करण्यासाठी आता बेस्ट कडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच बेस्टने मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखाची मदत तर 49 जखमींना मोफत औषधोपचार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचा गाडीवरील तोल गेल्याने ही बस आदळली.
बेस्ट कडून चौकशीसाठी समिती गठीत झाल्याची माहिती
#kurlaaccident pic.twitter.com/hPTnSy8LIi
— BEST Bus Transport (@myBESTBus) December 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)