Kurla BEST Bus Accident: कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बसचालक संजय मोरे याला मोठा धक्का बसला आहे. संजय मोरे याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. बस चालकाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 9 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच यात 40 हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, वैद्यकीय चाचण्यांमध्ये चालक मानसिक आजारी किंवा घटनेच्या वेळी मद्यधुंद नसल्याचं समोर आलं होतं.
कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातातील चालकाला दिलासा नाही -
Mumbai court denies bail to driver of BEST bus involved in December 9 accident that killed 7, injured over 40
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)