पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे सभामंडपामध्ये हजारो वारकरी उपस्थित आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी विविध पालख्या, दिंडीमधील वारकरी देखील सहभागी होणार आहेत. शिळा मंदिर हे एका दगडी पाटाला समर्पित केलेले मंदिर आहे, ज्यावर संत तुकारामांनी 13 दिवस तप केले होते. त्याचबरोबर शिळेजवळील मंदिरात संत तुकारामांची नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)