Pandharpur Wari 2023 : वारकऱ्यांनी दोन दिवसाचा पुणे ते सासवड लांब पल्ल्याचा रस्ता पार पाडला आहे. ह्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी योग साधक सज्ज झाले. योग साधकांनी वारकऱ्यांसाठी तिळाच्या तेलाची मालिस मिळाली. ह्या सेवेतून वारकऱ्यांचा उस्ताह आणखी वाढला आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हीच आमचीसाठी विठूरायाची सेवा करणे असा संकल्प योग साधककांकडून होत आहे, दिवेघाटाची अवघड वाट पार केल्या नंतर विठूच्या वारकऱ्यांना सेवा मिळाली.
वारकऱ्यांच्या पायाचे मसाज आणि मानेचे मसाज देखील योग साधकाकडून केला जात आहे. पायांचा थकवा दुर व्हावा, याकरिता पिंपरी चिंचवड संस्थेतर्फे शास्त्रसुध्द पध्दतीने योग साधकाकांकडून मसाज होत आहे, वारकऱ्यांना दिलासा मिळल्याचे दिसून येत आहे. यंया सहा ते सात हजार वारकऱ्यांनी ह्या योग साधकांकडून मसाज घेतल्याचे दिसून आले, एकावेळी 50 महिला आणि 50 पुरुषांचे मसाज केले जात आहे.
View this post on Instagram
परभणीत देखील सवंगडी कट्ट्याच्या मार्फत वारकऱ्यांना सेवा मिळत आहे. सवंगडी कट्टा गेले आठ वर्ष वारकऱ्याच्या सेवेत हजर आहे. स्वखर्चातून उभारलेले सवंगडी कट्टा दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेत सज्ज आहेत. पायांची मालिस करून देणं, आरोग्य तपासणी करणे अश्या अनेक सेवेत सवंगडी कट्ट्याचे कर्मचारी वारकऱ्याच्या सेवेत आहेत. वारकऱ्यांनी देखील याचा लाभ घेतला आहे.
View this post on Instagram
या सेवेतून वारकऱ्यांचे मन सुखावले आहे. रम्य निर्सगातून जाताना वारकऱ्यांची वारी मनमोहक दृष्य तयार करताना दिसत आहे,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)