हवामान विभागाकडून आज ठाणे जिल्ह्याला देण्यात आलेल्या रेड अलर्ट नंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 1ली ते 12वी च्या वर्गाच्या शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. मागील दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधारेमुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठी उल्हास नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने रेल्वे व्यवस्था देखील विस्कळीत झाल्याची पहायला मिळाली आहे. नक्की वाचा: Maharashtra Rain Updates: पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यात रेड अलर्ट; विदर्भासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज .
पहा ट्वीट
ठाणे जिल्ह्यात गेले २ दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना (इ. १ ली ते १२ वी) शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.#RainAlert #RainUpdate #Thane @TMCaTweetAway pic.twitter.com/lANGOlblU9
— MUKESH PAWAR (@Pawar_MukeshC) July 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)