Maharashtra Rain Updates: गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात, गावात जोरादर पाऊस अद्याप सुरुच आहे. मुसळधार पावसाने शहरातील नव्हे तर गावातील जनजीवन विस्कळीत झाली आहे. कोकण, पुणे आणि मुंबईत पावसाची संततधार चालूच आहे. मुंबई, पुण्यातील रस्त्यावर पाणी साचले आहे. गावातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे गावात देखील पूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर भारतीय हवामान खात्याने पुढील भागात मकेला आहे.
विदर्भ, कोकणात अनेक नद्यांना पूर आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भात येत्या २४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांनाही अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकार यावर नियंत्रित पणे काम करत आहे. मुंबईत मुसळधार पावसाने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल ट्रेन उशीरा धावत आहे. त्यामुळे देखील नागरिकांना त्रासाला सामोर जावे लागत आहे.
कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधा.र पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील काही भागात देखील पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. सरीकडे विदर्भातील वैनगंगा नदीला पूर आला असून गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणातील वशिष्ठी, पाताळगंगा आणि सावित्री नदीला पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.