IIT Bombay Unemployment Fake News: नुकतीच बातमी आली होती की, या वर्षी जानेवारीपासून आयआयटी बॉम्बेमध्ये प्लेसमेंटची नवीन फेरी सुरू झाली आहे. परंतु अद्याप 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. अनेक माध्यमांनी याबाबत अहवाल दिले होते. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे नोकऱ्या मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रावर निशाणाही साधला होता. आता यावर आयआयटी बॉम्बेचे स्पष्टीकरण समोर आले आहे. आयआयटी बॉम्बेने आता या वृत्तावर प्रतिक्रिया देत  ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे, 'अलीकडे अशी बातमी आली आहे की आयआयटी बॉम्बेच्या  30 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मात्र 2022-23 मधील पदवीधर विद्यार्थ्यांमधील एक्झिट सर्व्हे सांगतो की, फक्त 6.1% अजूनही नोकरीच्या शोधात आहेत.' यासोबतच संस्थेने सर्वेक्षण निकालही जाहीर केला आहे.

आयआयटी बॉम्बेने शेअर केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2022-23 मध्ये 57.1 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. तर 12.2 टक्के विद्यार्थी उच्च पदव्या घेत आहेत. सर्वेक्षणानुसार, 10.3 टक्के विद्यार्थी आयआयटी बॉम्बेबाहेर काम करत आहेत. 8.3 टक्के विद्यार्थी सार्वजनिक सेवेत आहेत. 1.6 टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहे. 4.3 टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्वेक्षणानुसार, केवळ 6.1 टक्के विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत. (हेही वाचा: Online Transaction Fraud: ऑनलाइन व्यवहार अयशस्वी प्रकरणात फसवणूक; खासगी बँकेला 4.5 कोटी रुपयांचे नुकसान, तिघांना अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)