Death Of 9-to-5 Jobs By 2034: इतिहासात जमा होतील 9 ते 5 नोकऱ्या, 2034 पर्यंत AI मुळे अनेक गोष्टी बदलतील; LinkedIn सह-संस्थापक Reid Hoffman यांची भविष्यवाणी

रीड हॉफमन यांचा विश्वास आहे की, एआय आणि ऑटोमेशनचा पुढील तीन दशकांमध्ये कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. याचा परिणाम असा होईल की 9-5 नोकऱ्या गायब होतील.

Death Of 9-to-5 Jobs By 2034: इतिहासात जमा होतील 9 ते 5 नोकऱ्या, 2034 पर्यंत AI मुळे अनेक गोष्टी बदलतील; LinkedIn सह-संस्थापक Reid Hoffman यांची भविष्यवाणी
Office Space in India

Death Of 9-to-5 Jobs By 2034: एआय लाँच झाल्यामुळे काम करण्याच्या संस्कृतीत बरेच बदल होऊ लागले आहेत. आता लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस चालित कर्मचारी वर्ग अतिशय गतिमान पद्धतीने बदल घडवून आणत आहे, ज्यामुळे 9-5 नोकऱ्यांवरही परिणाम होईल. साधारण 2034 पर्यंत, 9 ते 5 अशी नोकरी भूतकाळातील गोष्ट होईल. ते पुढे म्हणाले की, एआय मानवी जीवन सुलभ करेल मात्र वर्कफोर्स त्याची जागा घेऊ शकणार नाही.

रीड हॉफमन यांचा विश्वास आहे की, एआय आणि ऑटोमेशनचा पुढील तीन दशकांमध्ये कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. याचा परिणाम असा होईल की 9-5 नोकऱ्या गायब होतील. हॉफमन एका चर्चासत्रात बोलत होते. ते म्हणाले की सॉफ्टवेअर आणि रोबोट्ससह एआय इतक्या प्रगत टप्प्यावर आहे की, ते मानवी संभाषणे ऐकू शकते आणि माणसाप्रमाणे प्रतिसाद देऊ शकते. हे अद्भुत आहे. हा एक अतिशय रोमांचक विकास आहे, कारण मानव आणि एआय रोबोट यांच्यातील हे कनेक्शन एकाकीपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ते म्हणाले की, कंपन्यांचा मोठा भाग आता त्यांच्या दैनंदिन कामकाजात एआयचा समावेश करत आहे. एआय तंत्र, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स आणि ऑटोमेशन हे काम अधिक अचूक आणि जलद करण्यास सक्षम आहेत. याद्वारे कर्मचारी आपला वेळ सर्जनशीलतेसाठी वापरू शकतो. (हेही वाचा : OpenAI SearchGPT: ओपनएआयने लाँच केले सर्च इंजिन 'सर्च जीपीटी'; Goggle शी करणार स्पर्धा)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2024 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).