Maharashtra Assembly Election 2024: 'महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळायला हव्या'; MNS ची मागणी, 7 ते 13 ऑगस्टदरम्यान राबवणार 'रोजगार हक्क सप्ताह'
महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, यासाठी नवी मुंबई मनसेने 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू' केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024: मनसेने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पक्षाने राज्यात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नुकताच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौरा सुरु झळा आहे. त्यानंतर आता पक्षाने बेरोजगार तरुणाच्या समस्येवर लक्ष्य केंद्रित केले आहे. नवी मुंबईकरांच्या हक्काच्या रोजगारासाठी, मनसेने 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सही मोहीम, घरोघरी पत्रक वाटप, बेरोजगारांचे बायोडाटा गोळा करणे, विविध आस्थपणांना व कंपन्यांना निवेदन देऊन मनसे जनजागृती अभियान राबविणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, यासाठी नवी मुंबई मनसेने 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू' केला आहे. या संदर्भात मनसेने आज नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. नवी मुंबईतील ज्या युवकांना बायोडाटा देऊन अशी नोंदणी करायची असेल त्यांनी 9819113336 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा connect.gajanankalemns@gmail.com या ई मेलवर संपर्क करू शकता. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा; 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात)
पहा पोस्ट-
नवी मुंबईकरांच्या हक्काच्या रोजगारासाठी...मनसेचा 'रोजगार हक्क सप्ताह सुरू.
सही मोहीम, घरोघरी पत्रक वाटप, बेरोजगारांचे बायोडाटा गोळा करणार, विविध आस्थपणांना व कंपन्यांना निवेदन देऊन मनसे जनजागृती अभियान राबविणार.
८० टक्के स्थानिकांना नोकरी नाही दिली तर उद्योगमंत्री उदय सामंत व… pic.twitter.com/N6eKFD5RIt
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2024 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

