Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा; 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar NCP) पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे. महायुती सरकारच्या काळातील घोटाळे आणि खोट्या आश्वासनांचा जनतेपुढे पर्दाफाश करण्याचा उद्देश या यात्रे मागे आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी केली. (हेही वाचा:Vidhansabha Election 2024: विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवार ठरले; दिलीप धोत्रे, बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी )
महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेले आहे. राज्यातील अनेक उद्योक राज्याबाहेर गेले आहे. मोजक्या उद्योगपचींची भरभराट झाली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व राज्यकर्ते उघड्या डोळ्यांना पाहत बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.(Maharashtra Vidhan Sabha Elections: लातूर मध्ये राज ठाकरे यांच्याकडून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी; विधानसभेसाठी मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर)
9 ऑगस्ट या दिवशी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा क्रांती मैदानातून देण्यात आला होता. त्यासोबत या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याने देखील हा निवडल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले. राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय आहे. परिणामी सरकार वाचवण्यासाठी महायुतीकडून वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करण्यात आला आहे. तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहेत. असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.
तर, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा आदर्श राखून महाराष्ट्रात गद्दारी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवू असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2024 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

