Santosh Nagargoje | Facebook

सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी आज लातूर (Latur)  मध्ये तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. लातूर मध्ये राज ठाकरेंकडून संतोष नागरगोजे (Santosh Nagargoje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या लातूर ग्रामीण मध्ये संतोष नागरगोजे यांचा मुकाबला धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्याशी होणार आहेत. संतोष नागरगोजे हे मनसेचे सरचिटणीस आहेत. लातूर ग्रामीण (Latur Rural Assembly Constituency) मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांधिक्याने पराभव केला होता. दरम्यान लातूरमध्ये संतोष नागरगोजे हे सध्या मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील काम पाहत आहेत. संतोष नागरगोजे यांनी 2014 मध्ये मनसेकडून लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढवली होती.

मनसे कडून यापूर्वी राज ठाकरेंनी मुंबईत शिवडी मधून बाळा नांदगावकर तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मनसे 225-250 उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा यापूर्वीच राज ठाकरेंनी केली आहे. त्यानुसार आता दौरा करताना त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांच्या गाठी-भेटीसोबत काही उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे. Raj Thackeray Marathwada Tour: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने येत्या 4 ऑगस्टला मराठवाड्यापासून सुरु होणार राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; पहा तपशीलवार कार्यक्रम .

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आता मनसे कडून उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. राज ठाकरे या निवडणूकीमध्ये स्वबळावर निवडणूकांना समोरे जाणार आहेत. त्यांनी  मराठवाड्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'नवनिर्माण यात्रेला' सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांनी  लातूर पूर्वी धाराशिव आणि सोलापूर ला भेट दिली आहे.