Raj Thackeray Marathwada Tour: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला पाठींबा दिला असला तरी, विधानसभा ते स्वतंत्रपणे लढवणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 250 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली होती. यानंतर आता विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. येत्या 4 ऑगस्टपासून मराठवाड्यापासून याची सुरुवात होईल. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा तपशीलवार कार्यक्रम मनसे पक्षाकडून सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

पक्षाने म्हटले आहे, ‘आगामी विधानसभांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर राजसाहेबांच्या दौऱ्याच्या रूपाने 'नवनिर्माणाची' लाट महाराष्ट्रभर येणार आहे. येत्या 4 ऑगस्टला राजसाहेबांच्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा मराठवाड्यापासून सुरु होत आहे.’ (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: प्रशासनात एकत्र, राजकारणात स्वतंत्र! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी BJP, Shiv Sena आणि NCP (AP) काढणार वेगवेगळ्या यात्रा)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)