Huge Rush at Ghatkopar Station: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी घरी परतत असताना, मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहेत. दुपारी मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतुक ठप्प झाली होती. ही वायरची समस्या व त्यानंतर ट्रेनला होणारा 20 ते 40 मिनिटांचा विलंब यामुळे मध्य रेल्वेच्या जवजवळ सर्व स्थानकांवर, विशेषतः घाटकोपर स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक दाटीवाटीने स्टेशनवर उभे असलेले दिसत आहेत. अगदी प्लॅटफॉर्मपासून ते रेल्वे ब्रिजपर्यंत माणसांचे लोंढे दिसत आहेत. स्थानकावर गर्दी वाढत असून, लोक या रेल्वेच्या समस्येमुळे अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. याबाबत एका प्रवाशाने सांगितले की, तो संध्याकाळी 7 वाजता घाटकोपरला पोहोचलो, मात्र इतक्या गर्दीमुळे त्याला पुढे जाण्यासाठी 8.45 वाजता ट्रेन मिळाली. (हेही वाचा: Overhead Wire Break Down Near Thakurli: ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतूक ठप्प)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)