Naked Man Enters Ladies Compartment: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज अनेक विचित्र घटना घडत असतात. याचे अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात. आता मुंबई लोकलमध्ये अजून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नग्न व्यक्ती मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात चढला होता. यामुळे बराच गदारोळ झाला. ही व्यक्ती डब्यात चढताच महिला घाबरल्या आणि आवाज करू लागल्या. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. कपड्यांशिवाय कोचमध्ये चढलेली ही व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घाटकोपर रेल्वे स्थानकातून समोर येत आहे. महिलांनी आवाज केल्यानंतर टीसी घटनास्थळी पोहोचला आणि त्याने त्या व्यक्तीला डब्यातून बाहेर काढले व त्यानंतर ही व्यक्ती तेथून निघून गेली. सोमवारी सायंकाळी 4.11 च्या सुमारास कल्याण एसी लोकल घाटकोपर स्थानकात थांबली, त्यावेळी हा मानसिक रुग्ण ट्रेनमध्ये चढला. महिलांचा आवाज ऐकून लोको पायलटने ट्रेन थांबवली. यानंतर टीसी आले आणि व्यक्तीला बाहेर काढले. (हेही वाचा: Viral Video: कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी जाळणाऱ्या लाकडावर झोपला एक व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल)

महिलांच्या डब्यात चढला नग्न पुरुष-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)