Overhead Wire Break Down Near Thakurli: ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान तांत्रिक समस्येमुळे 14.28 वाजेपासून डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमची तांत्रिक टीम त्यावर काम करत आहे.
Overhead Wire Break Down Near Thakurli: सोमवारी दुपारी ठाणे जिल्ह्यातील मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतुक ठप्प झाली. या व्यत्ययामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मध्य रेल्वेने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान तांत्रिक समस्येमुळे 14.28 वाजेपासून डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमची तांत्रिक टीम त्यावर काम करत आहे. त्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल खेद आहे. डोंबिवलीतील शासकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंद्रे म्हणाले की, ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वायर तुटून सेवा विस्कळीत झाली आहे.
Central Railway : ठाकुर्लीला ओव्हरहेड वायर तुटली, लोकल वाहतुक ठप्प; आठवड्यात दुसऱ्यांदा रेल्वे विस्कळीतhttps://t.co/cK3Tod2YVa#centralrailway #thakurli #mumbailocal
— Maharashtra Times (@mataonline) August 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

