दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार, यंदा फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता संपेल. उदय तिथीनुसार होलिका (holika dahan date) दहन 13 मार्च 2025 ला असणार आहे. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येते. महाराष्ट्रात त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण साजरा होतो. यंदा रंगपंचमी 19 मार्च 2025 ला साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील होळी सण हा रंग, संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेला असतो, ज्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात. विशेषतः कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावेळी अनेक लोक आपापल्या घरी जातात, अशा लोकांसाठी रेल्वे होळीच्या निमित्ताने ज्यादा गाड्या चालवणार आहे.

होळी 2025 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुढील अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)