Helicopter Crashes in Pune: पुण्यात आज, बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली. प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये चार जण असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी धुक्यामुळे हेलिकॉप्टर डोंगराला धडकले व हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातनंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून 4 वाहने आणि शासकीय रुग्णवाहिका 108 घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले दोघेही पायलट असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहे.
माहितीनुसार, सकाळी पावणेसात वाजता हा अपघात झाला. हेलिकॉप्टरणने ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले व ते मुंबईच्या जुहूच्या दिशेने जात होते. मात्र धुक्यामुळे ते डोंगराला धडकले व त्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला. काही दिवसांपूर्वीही या भागात आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. (हेही वाचा: Purandar International Airport Update: पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत महत्वाचे अपडेट; भूसंपादन सुरू करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश)
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले-
Helicopter crashes in Maharashtra's Pune district; two persons feared killed, say police
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2024
बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले...
आज सकाळी धुक्यामुळे डोंगराला ते धडकल्याने त्यातील तीन जण गेल्याचे कळते आहे. अत्यंत वाईट घटना 😐#pune #Accident pic.twitter.com/4l3JmUjOVL
— Shrikishan Kale श्रीकिशन काळे (@shrikaleLokmat) October 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)