Mumbai Rain Update: महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होत आहे. राज्यात यंदाचा मान्सून चांगला बरसणार असल्याचे संकेत आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागाने (Weather Department)दिले आहेत. आज सकाळी मुंबईत पाऊस (Mumbai Rain) जोरदार बरसल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. दादर आणि लगतच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजप्रमाणे उद्याचे हवामान देखील असेल राहण्यचा अंदाज असल्याने मोठा रेन बँड तयार झाला असून, कदाचित न थांबता मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ऑफिसला जाताना छत्री सोबत ठेवावी. (हेही वाचा: Mumbai Rain: मुंबईत दमदार पावसाची हजेरी! जीटीबी नगर स्थानकातील दृश्य, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा (Watch Video).
पोस्ट पाहा-
Heavy rain alert for Dadar & adjoining areas. Big rain band is present over the centre, and will give non-stop heavy rains. Carry umbrellas while heading to the office Mumbaikars. #MumbaiRains https://t.co/dzHyMqrYex pic.twitter.com/5MThacBwiY
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)