राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेतअशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.

४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्यफळपीकेभाजीपालागहूहरभराकांदाद्राक्षस्ट्रॉबेरीसंत्रामका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईलअसे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.       

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)