Beachfront Home Collapses into Sea: नॉर्थ कॅरोलिनाच्या आऊटर बँक्स येथे, नयनरम्य समुद्र किनाऱ्यावर एक मोठे घर उभे होते. समुद्रांच्या लाटांचा मारा सहन करत ते तग धरून उभे असतानाच अचानक आलेल्या अर्नेस्टो चक्रीवादळमुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे बीचफ्रंट घर समुद्रात कोसळलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ट्रेंडिंग पॉलिटिक्सचे सह-मालक कॉलिन रग यांनी रविवारी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर घर कोसळल्याचा व्हिडिओ शेअर केला. "बिचफ्रंट होम उत्तर कॅरोलिनाच्या समुद्र किनाऱ्यावर अटलांटिक महासागरात होते. ते कोसळले ही घटना अटलांटिकच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या हरिकेन अर्नेस्टो चक्रीवादळामुळे घडली. 2018 मध्ये मालकाने 4-बेड, 2-बाथ होम असलेल हे घर $339,000 मध्ये खरेदी केले होते. घर 1973 मध्ये बांधले गेले होते," असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

बीचफ्रंट घर समुद्रात कोसळलं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)