6 ऑक्टोबरची मध्यरात्र गोरेगाव येथील जय भवानी इमारतीच्या रहिवासींसाठी काळरात्र ठरली आहे. 8 जणांनी यामध्ये जीव गमावला आहे तर 50 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. अनेकांनी या दुर्घटनेबद्द्ल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेतली आहे. दरम्यान त्यांनी मृतांच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. नक्की वाचा: Goregaon Fire Incident: गोरेगाव आग दुर्घटनेमध्ये मृत आणि जखमींची रूग्णालय निहाय यादी जाहीर .
पहा ट्वीट
Goregaon Fire | Prime Minister Narendra Modi announces an ex-gratia of Rs 2 Lakhs from PMNRF for the next of kin of each deceased and Rs 50,000 for the injured. #Mumbai pic.twitter.com/C4k85UAx7V
— ANI (@ANI) October 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)