गोरेगाव (Goregaon Fire Incident) येथील जय भवानी इमारतीला (Jai Bhavani Building) काल मध्यरात्री आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इमारतीमधील निवासी गाढ झोपेत असल्याने अनेकांना आग लागल्याचा अंदाज आला नव्हता. इमारतीमध्ये प्रचंड धूर झाला. नंतर अग्निशमन दलाने गच्चीवर पोहचलेल्या नागरिकांची सुटका केली. आगीतून सुटका केलेले काही जण क्रिटिकल स्थितीमध्ये आहेत. 51 जखमींवर विविध हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. आता बीएमसीने जखमी आणि मृतांची यादी जाहीर केली आहे.
पहा ट्वीट
Mumbai | BMC issues a list of the deceased and injured in the Goregaon fire incident.
The death toll in the incident stands at seven. pic.twitter.com/SML6SdT7Sh
— ANI (@ANI) October 6, 2023
गोरेगाव आग दुर्घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार, मुंबईचे पालकमंत्री यांनी घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच या आगीबद्दल पोलिस, बीएमसी कडून माहिती घेत असल्याचं म्हटलं आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जातील. दरम्यान मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपण आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमत आहोत आणि 15 दिवसांत त्यांचा अहवाल हाती येईल असं म्हटलं आहे.
स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांनी घटनेची माहिती देताना रात्री लागलेल्या आगीचा धूर इमारती मध्ये घुसला. या धूरामुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने आगीची माहिती मिळाली. सध्या आगीतून सुखरूप बाहेर पडलेल्यांची सोय पालिकेच्या शाळेत केली जात आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची देखील सोय बघितली जात असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.