Fire In CNG Bus At Oshiwara Bus Depot: शुक्रवारी दुपारी मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, डेपोमध्ये एक कंत्राटदार हंसा सिटी सीएनजी बस दुरुस्त करत असताना ही घटना घडली. सोशल मीडिया वेबसाइटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बस डेपोमधील गॅरेजमधून लोक बाहेर पळताना दिसत आहेत. काही लोक आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर करतानाही दिसत आहेत. कर्मचाऱ्यांनी बस डेपोमध्ये पुढील धोका टाळण्यासाठी जळत्या बससमोर उभी असलेली कार हलवली. त्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

ओशिवरा बस डेपोमधील दृश्य -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)