Fire Video: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रविवारी राजनगाव शेणपुंजी मेनरोडवर असलेल्या तीन दुकानांना आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीत या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर येत आहे. आग लागताच स्थानिक नागरिकांनी तातडीने वाळूज एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. (हेही वाचा-  उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)