Thane: उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video

ठाण्यातील उपवनच्या गेटजवळ असलेल्या कृष्णा टॉवरच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर सूर संगीत हॉटेल आणि बार आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Thane: उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video
Sur Sangeet Hotel Fire (PC - Twitter/@fpjindia)

Thane: आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 6.56 च्या सुमारास ठाण्यातील उपवनच्या गेटजवळ असलेल्या कृष्णा टॉवरच्या पहिल्या मजल्यावर (तळ मजला + 4 मजले) आग लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर सूर संगीत हॉटेल आणि बार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी आणि वर्तक नगर विभाग समितीचे कर्मचारी, एक फायर ट्रक, एक पाण्याचा टँकर आणि दोन बचाव वाहनांसह घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जावानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा -Mumbai: अंधेरी येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची भिंत कोसळली; 5 जण जखमी)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2023 08:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).