Palghar: पालघर जिल्ह्यातील नवगढ परिसरात आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली आहे. नवगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मुलीला धमकावत तिच्यावर बलात्कार करत होता. पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिचा गैरफायदा घेत असे. पीडित तरुणीने त्याला विरोध केला तर तो तिला बेदम मारहाण करत असे. तिने ही घटना तिच्या मोठ्या बहिणीला सांगितली. त्यानंतर तिने पीडितेला जवळच्या पोलिस ठाण्यात नेले. मुलीच्या तक्रारीच्या आधारे नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Wife Murder Husband: दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या, आरोपी पत्नी स्वत: पोलिस ठाण्यात हजर)
Maharashtra: Father arrested for raping 14-year-old daughter
More: https://t.co/3kojyeuQPs#Maharashtra #Crime #Rape #ChildAbuse pic.twitter.com/I94rgzKgT3
— First India (@thefirstindia) January 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)