Wife Murder Husband: दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या, आरोपी पत्नी स्वत: पोलिस ठाण्यात हजर
महाराष्ट्रातील नागपूर शहरात दारूच्या व्यसनाला कंटाळून एका पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Wife Murder Husband: महाराष्ट्रातील नागपूर शहरात दारूच्या व्यसनाला कंटाळून एका पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या थराकाप उडवणाऱ्या घटनेमुळे नागपूर शहर हादरलं आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. पत्नीने रात्री पती निद्रावस्थेत असताना त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून हत्या केली. रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत राहिली त्यानंतर सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिसांनी पुढील तपासणी सुरु केली आहे. (हेही वाचा- सिगारेटची अॅश फेकण्यासाठी बाल्कनीत आलेल्या तरुणाचा 33व्या मजल्यावरून पडून मृत्यू)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंनद भदूजी पाटील असं मृत पतीचे नाव आहे. अरूणा असं आरोपी पत्नीचे नाव आहे. आंनद हा मजुरीचे काम करीत होता. दारूचे व्यसन असल्याने तो मजूरीतून मिळालेल्या पैसांची दारू पियायचा. त्यामुळे घरात कौटुंबिक वाद व्हायचा. कधी कधी दारुच्या पैशासाठी पत्नीला मारहाण करायचा. याच गोष्टीला कंटाळून अरुणाने पतीचे हत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान शनिवारी त्याने दारूसाठी पत्नीकडे पैसे मागितले. पण तीने पैसे देण्यास नकार दिला. मात्र त्याने वाद घालून पत्नीला बुक्की बुक्कीने मारहाण केली. भांडणानंतर तो बाहेर गेला आणि रात्री दारू पिऊन घरी आला. त्यानंतर झोपला. मारहाण, भांडण, दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने मध्यरात्री पतीच्या डोक्यात भला मोठा दगड घातला.
रक्ताच्या थारोळ्यात आणि जखमी अवस्थेत पडून राहिला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर रविवारी सायंकाळी तिने कामठी पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसही चक्रावले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी अरुणावर हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आणि तिला अटक केली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2024 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

