पुणे येथे 'दो धागे श्री राम के लिए' मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या संयजिका अनघा घैसास यांनी म्हटले आहे की, येथे येणारा प्रत्येक व्यक्ती दोन धागे विणतो. दोन धाग्यांचे काय होईल, असा प्रश्न कुणालाही वाटेल, पण जेव्हा लाखो लोक एकत्र येतात. प्रत्येकी दोन धागे विणून तयार केलेले कापड एकतेचे प्रतिक बनते. हिंदू समाज एकजुटीने एकत्र यावा हा यामागचा मुख्य प्रयत्न आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन ते चार लाख लोकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सर्वांनी प्रभू रामासाठी काहीतरी करण्याची भावना आहे.. ते येऊन दोन धागे विणू शकतात. शुद्ध रेशमी धागे आणि चांदीच्या जरीचा वापर केला जात आहे आणि तयार केलेले कपडे भगवान राम परिधान करतील.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र आणि पुण्याच्या हेरिटेज हँडविव्हिंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्टने 10 डिसेंबर रोजी सुरू केलेल्या 'दो धागे श्री राम के लिए' या 13 दिवसीय मोहिमेअंतर्गत अयोध्येतील रामलल्लासाठी वस्त्र (कपडे) विणले जाणार आहेत. यात अनेक लोक सहभाही होत असल्याचेही अनघा घैसास सांगतात.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)