शिक्षित व उच्च शिक्षित पात्र युवकांना शासकीय नोकरी भरती प्रक्रियेत विशेष बाब म्हणून सवलत देण्यात येईल. तसेच महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनेंतर्गत बचतगटाच्या माध्यमातून प्रत्येक गटास 7.5 लाख रुपये प्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. त्यावेळी इथल्या नागरिकांच्या  कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास त्यांनी दिला. (हेही वाचा:  ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणखी 3 रुग्णांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रुग्णालयाला भेट, 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)