महाराष्ट्रात ‘वसुबारस’ दिवसापासून दिवाळीच्या सणाची सुरुवात होते. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. आज वसुबारस निमित्त पंढरपूरच्या श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीचे नयनरम्य फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे येत्या 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येते. मात्र यंदा पहिल्यांदाच महापूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. (हेही वाचा: Dhanteras 2023 Rangoli Designs: धनत्रयोदशी निमित्त कुबेर देवतेचा आर्शीवाद मिळवण्यासाठी घराबाहेर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, Watch Video)
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) November 9, 2023
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
आज वसुबारस निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे...
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇 pic.twitter.com/Jxg3CH2Z36
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) November 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)