तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत. मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी 13 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पहा ट्वीट
#तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरणी अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने ४ महंतासह ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती pic.twitter.com/rlpdNC554b
— AIR News Pune (@airnews_pune) December 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)