Dhanteras 2023 Rangoli Designs: धनत्रयोदशी निमित्त कुबेर देवतेचा आर्शीवाद मिळवण्यासाठी घराबाहेर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, Watch Video
Dhanteras 2023 Rangoli Designs (PC - You Tube)

Dhanteras 2023 Rangoli Designs: यावर्षी धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) सण शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी भगवान कुबेर, माता लक्ष्मी आणि धन्वंतरी यांची पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणेही खूप शुभ असते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे व्यक्तीला 13 पट अधिक लाभ मिळतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, वाहने, पितळ आणि झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते, म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर यांची प्रतिमा असलेली रांगोळी काढणे अधिक फळदायी ठरू शकते. या रांगोळीमध्ये लाल आणि पांढरा रंग वापरावा. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही खालील व्हिडिओ पाहून खास रांगोळी डिझाईन्स काढून आपल्या अंगणाची शोभा वाढवू शकता. (वाचा - Happy Dhanteras 2023 Messages: धनत्रयोदशीच्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारा शेअर करत साजरा करा धनतेरस)

धनत्रयोदशी खास रांगाळी व्हिडिओ - 

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या काळात अत्यंत शुभ मानला जाणारा मौल्यवान धातू म्हणजे चांदी. तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी आणण्यासाठी तुम्ही दागिने, नाणी किंवा चांदीची भांडी खरेदी करू शकता.