महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी दुपारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, बुधवारी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते निदर्शने करत होते. दुपारी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मेट्रो सिनेमासमोरील बॅरिकेड्सही हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना यलो गेट पोलिस ठाण्यात आणले गेले.
Former Chief Minister Devendra Fadnavis and other BJP leaders being taken to Yellow Gate police station after they were detained while staging a protest demanding Minister Nawab Malik's resignation pic.twitter.com/GkKa4omdGV
— Express Mumbai 😷 (@ie_mumbai) March 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)